नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या अनेक दिवसांपासून नेमकी विधानसभा निवडणूक केव्हा घोषीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता विधानसभा निवडणूकीच्या तारख्यांची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल आणि
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. उमेदवारांना २२ ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची सुरूवात होईल. २९ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पार पाडली जाईल. ३० ऑक्टोबर रोजी उमेदवारांच्या अर्जाची छाणणी होईल आणि ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख राहिल व २० नोव्हेंबरला मतदान होईल व २३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणूकीचा निकाल लागेल.