
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देवगाव-देवळी येथील महात्मा ज्योतीराव फुले हायस्कूल शाळेचा मार्च २०१९ दहावीचा निकाल ८४:७८ टक्के लागला आहे. तर शाळेतून आश्विनी ज्ञानेश्वर माळी 84 :40 टक्के मिळवून प्रथम आलीय.
देवगांव देवळी हायस्कूलमधून निखिल संजय माळी 83 :६० टक्के मिळवून द्वितीय तर सचिन जाधव 81:४० टक्के मार्क मिळवून तृतीय आला आहे. यासर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी शाळेची गुणवत्ता कायम ठेवली आहे. शाळेतून मार्च 2019 च्या दहावीच्या परीक्षेत 46 विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी 14 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये तर 22 विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास झाले आहेत. तीन विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये उत्तीर्ण झाले, असे एकूण 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा निकाल 84:78 टक्के लागला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील सचिव मंदाताई पाटील व संचालक मंडळ यांनी केले. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन शिक्षक आय.आर.महाजन, एस के महाजन एच.ओ. माळी, अरविंद सोनटक्के यांचे मार्गदर्शन लाभले.