पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।आदिवासी विकास विभागातील शासकीय अनुदानित आश्रम शाळेतील राज्यभरातून मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी काळ्याफिती लावून शिक्षक दिनावर आदिवासी विकास आश्रमशाळा सीटू संघटनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले, असे संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ डी एल कराड व राज्य सरचिटणीस प्राध्यापक बी टी भामरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
आंदोलांकर्त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये, आश्रमशाळा शिक्षकांना सन्मानाने वागणूक देणे, आश्रम शाळेची वेळ पूर्वीप्रमाणे अकरा ते पाच करणे, दहा वीस तीस ही त्रिसरी वेतनश्रेणी लागू करणे, सुधारित आकृतीबंध रद्द करणे, आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक देणे, शिक्षण विभाग व वस्तीगृह विभाग वेगळा करणे, रोजंदारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, मुख्याध्यापकांना व गृहपालांना राजपत्रित दर्जा देणे,सर्व सवर्गाची रिक्त पदे भरणे, विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सोईसुविधा पुरवणे, एम पी एस रकमेचा प्रोन नंबर देणे, काम नाही वेतन नाही शासन निर्णय रद्द करणे, नियतकालिक बदल्या ऑनलाइन पद्धतीने करणे, आधी मागण्यांसाठी आज शासकीय व अनुदानित आश्रम शाळेचे राज्यभरातील हजारो कर्मचारी आंदोलनात सहभागी झालेले होते.
निवेदनाच्या प्रति मा राष्ट्रपती ,प्रधान मंत्री व गृहमंत्री नवी दिल्ली व जे पी नड्डायांना तसेच राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,आदिवासी विकस मंत्री ,आयुक्त व सचिव आदिवासी विकास यांना पाठवण्यात आलेल्या आहेत. यासाठी राज्य कौन्सिल,ठाणे विभागीय अध्यक्ष राजेश पाटील,नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा अमोल वाबळे, अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ अशोक झुंझारे, व नागपूर विभागीय अध्यक्ष तसेच सर्व प्रकल्प कार्यकारणी पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.