मुक्ताईनगर प्रतिनिधी । डॉक्टर उल्हास पाटील हे नवसाचे उमेदवार असून त्यांना विजयी करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते कुर्हा-काकोडा येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार शिरीष चौधरी ,अरुण पाटील, हेमलता पाटील ,डीजी पाटील, उदयसिंह पाटील ,राधेश्याम चौधरी ,सुलोचना वाघ, अॅड रवींद्र पाटील ,जगन सोनवणे,निळकंठ फालक, डॉक्टर जगदीश पाटील, राहुल मोरे, मुनव्वर खान, सलीम पटेल ,विनोद तराळ, किशोर चौधरी, ईश्वर राहणे, आनंदराव देशमुख, यू. डी. पाटील, आत्माराम जाधव, आसिफ खान इस्माईल खान, डी ओ पाटील, संजय पाटील, डॉक्टर विष्णू रोटे ,शेख रहीम शेख यासीन, दिलीप सिंग राजपूत, सलीम पटेल, देवेंद्र मराठे,श्रीमती सावकारे ,सौ मनीषा जावरे, नीरज बोराखडे, बलदेवराव चोपडे, प्रकाश पाटील, शरद महाजन सुभाष पाटील आदीप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुक्ताईनगर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आत्माराम जाधव यांनी केले.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, गेल्या पाच वर्षात शेतकरी हवालदिल झाला असून केवळ मराठवाड्यातच दोनशे शेतकर्यांनी चार महिन्यात आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारने कर्जमाफी घोषित करुन दोन वर्ष झाली मात्र अद्यापही कुणाला कर्जमाफी मिळालेली नाही. केवळ अभ्यास करणारे हे सरकार सर्वच क्षेत्रात नापास झाले असून गेल्या पाच वर्षात दोन कोटी युवकांचे रोजगार जाऊन त्यांना भजे तळण्याचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे सांगतात. हाताला काम नाही, शेतीला दाम नाही असं यापूर्वी कधी घडले नाही म्हणून या सरकारला खाली खेचण्याचे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले. बर्याच दिवसांनी रावेर लोकसभा मतदार संघात पंजा दिसला असून नवसाच्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.