बुलढाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आज बुधवार, दि. १३ जुलै २०२२ रोजी सकाळी काला झाल्यावर श्री क्षेत्र पंढरपूर येथून पालखीचे शेगांव करीता प्रस्थान झाले.
श्रींचे पालखीचे आषाढ शु. १५ बुधवार दि. १३ जुलै २०२२ रोजी सकाळी काला झाल्यावर श्री क्षेत्र पंढरपूर येथून शेगांव करीता प्रस्थान झाले. श्रींची पालखी करकंब, भगवान बार्शी, बीड, गेवराई, जालना, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, जानेफळ, खामगांव या मार्गाने सुमारे ५५० कि.मी.चा प्रवास करून श्रावण शु. ६ म्हणजेच बुधवार. दि.०३ ऑगस्ट २०२२ रोजी शेगांव येथे आगमन होईल
आषाढी वारीचे पर्वामध्ये श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीचे पर्वावर श्री क्षेत्र पंढरपूर शाखेव्दारा श्री गजानन महाराज मठामध्ये नवमी, दशमी, एकादशी व बारस या कालावधीत लाखो भक्तांना श्री महाप्रसाद वितरीत करण्यात आला. तसेच वारी निमित्त पंढरपूर शास्रेत आलेल्या ४७ दिंड्यांपैकी नियमाची पूर्तता केलेल्या ३३ भजनी दिंड्यांना भजनी साहित्यासह श्री संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे वारीत सहभागी झालेल्या वारकन्यांसाठी धर्मार्थ अॅलोपॅथीक फिरते रूग्णालयाचे माध्यमातून ३० हजार भाविकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत श्री संस्थेव्दारा शेगांव, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्री महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, तेलंगणा अशा ९ राज्यामधील ७६ जिल्ह्यातून आलेल्या १८ हजार ८७८ गावांना भजनी साहित्य व श्री संत वाङमयाचे वितरण करण्यात आले आहे. अशा रितीने श्री पंढरीनाथाचे व श्री कृपेने श्री संस्थानकडून वारकऱ्यांची सेवा घडून आली आहे. अशी माहिती श्री संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या वतीने देण्यात आली आहे.