सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबीर

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | हिंदवी स्वराज्याचे शिलेदार नरवीर योद्धा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथी निमित्त कोळी युवक मंचच्या वतीने आज शहरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.

शहरातील प्रवर्तन चौकात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप तायडे , डॉ.दिवाकर पाटील , चंद्रकांत भोलाणे , नगरसेवक बबलु कोळी, संजय कांडेलकर, संजय कोळी, नगरसेवक निलेश शिरसाठ, जि.प.सदस्य निलेश पाटील, गोपाळ सोनवणे, जीवराम कोळी, शिवाजी पाटील, सूर्यकांत पाटील, महेंद्र मोंढाळे, युवराज कोळी , संजय बावस्कर , उमेश तायडे, विनोद कांडेलकर, भास्कर कोळी, दीपक कांडेलकर, राजु जाधव, अमोल कांडेलकर तसेच प्रमुख उपस्थिती आमदार चंद्रकांत पाटील , ललित महाजन , प्रविण पाटील, प्रशांत भालशंकर , अतुल जावरे , आसिफ बागवान , अनंतराव देशमुख , विनायक वाडेकर , शरद बोदडे , दीपक पवार ,प्रवीण भोई उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशस्वीतेसाठी अध्यक्ष पंकज कोळी , अर्जुन कोळी , शुभम तायडे , गजानन कोळी , अक्षय बावस्कर , शुभम कोळी , विष्णु कोळी , सुरज कोळी , गौरव कोळी , आदित्य कोळी , गणेश इंगळे , रोहन पाटील , लोकेश तायडे , कुलजीत पाटील , सौरभ लढे , महेश सोनार , गजानन राऊत , कृष्णा कोळी , शंकर कोळी , भुषण इंगळे , प्रतीक तायडे , गणेश इंगळे , रवींद्र लोंढे , विकास सूर्यवंशी , शंकर खोंडे व इतर कार्यकर्त्यांनी मेहनत परिश्रम घेतले.

Protected Content