पोलिस निरीक्षकाच्या घरी झालेल्या छापेत तब्बल ९७० ग्रँम सोने; एसीबीची कारवाई

बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बीड शहरात एक कोटीच्या लाच प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक एसीबीच्या जाळयात आला. हरिभाऊ खाडे असे पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्या घरावर एसीबीने छापा टाकत घरातून एक कोटी आठ लाख रूपयांची रोकड, 970 ग्रॅम सोने व पाच किलो चांदी आणि त्यांच्या नावावरील पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तेची कागदेपत्रे जप्त करण्यात आली आहे. एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रविभूषण जाधवर हे फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गतवर्षी 100 कोटीच्या घोटाळा झाला होता. या प्रकरणी प्रमुख बबन शिंदे आणि अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल झाले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. याच प्रकरणांमध्ये आरोपी बबन शिंदे यांनी दोन व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी 60 लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची चौकशी सुद्धा आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू होती. याच गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची भीती दाखवून पीआय खाडे यांनी या दोघांकडे 50 लाख, अशी एकूण एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. अखेर 30 लाखात तडजोड झाली होती. यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता देत असतानाच खासगी व्यापारी कुशाल जैन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चार महिन्यांपासून खाडे हे त्यांना त्रास देत होते. अखेर 13 मे रोजी रात्री उशिरा बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर 14 मे रोजी खात्री केली. 15 मे रोजी पैसे घेऊन तक्रारदार खाडे यांच्याकडे गेला होता. यावर खाडे याने आपण पुण्याला आलो असून जैन या व्यापाऱ्याकडे पैसे देण्यास सांगितले. जैनने पैसे स्विकारताच एसीबीने त्याला पकडले.

Protected Content