यावल येथे तरूणीची गळफास घेवून आत्महत्या; यावल पोलीसात घटनेची नोंद

यावल प्रतिनिधी । शहरातील फालक नगरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यावल पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल शहरातील फालक नगरात राहणारी पुजा भैरवलाला प्रजापती (वय-१९) ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह राहते. पुजा हिने रात्री आपल्या कुटुंबियांसह जेवण करून झोपले होते. दरम्यान, मध्यरात्री घरात सर्वजण झोपलेले असतांना घराच्या छताच्या लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास घेवून आत्महत्या केली. आज सकाळी ७ वाजता वडील भैरवलाल प्रजापती हे उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी भैरवलाल प्रजापती यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भैरवलाला प्रजापती हे गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून यावल शहरात भेलपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. ते मुळ रहिवाशी सेतवाणा जि. चित्तोडगड (राजस्थान) येथील आहे. तरूणीने गळफास घेतल्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पुढील तपास पो.कॉ. नेताजी वंजारी करीत आहे. यावल ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आाले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content