यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथीलआदिवासी प्रकल्प विकास विभागांतर्गत प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवाच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विभागांत प्रकल्पाच्या माध्यमातून शासन स्तरावरील विविध योजनांची शिस्तबद्ध व नियमांच्या चाकोरीत राहुन अमलबजावणी करण्यात आले असुन,सर्व आदिवासी बांधवांपर्यंत पोहचवणे व आदिवासी बांधवांचे जिवनमान प्रगतीपथावर आणण्याचे काम आदिवासी प्रकल्प विभागात करण्यात यशस्वी असे प्रयत्न करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना विविध योजना मिळवून देण्यासाठी आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथे असुन.या विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांच्या कार्यालय मार्फत जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना विविध योजना राबवून त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले जातात. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी आदिवासी बांधवान साठी विविध योजना आणि विकास कामे राबवून आदिवसी बांधवा मध्ये मिळून मिसळून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी प्रयत्न केलेला आहे.
त्यांच्या या कार्याचा गौरव महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री व पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेकडून २०२३/२४ या वर्षात जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अरुण पवार प्रकल्प अधिकारी यावल यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. प्रकल्प अधिकारी अरूण पवार यांचा सन्मान झाल्याबद्दल त्यांच्या सर्वसह अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.