जळगाव प्रतिनिधी । येथील पु.ना. गाडगीळ कलादालनात प्रा. वंदना परमार यांचे ज्योस्त्निका हे खास महिलांना समर्पित असणारे चित्रप्रदर्शन भरविण्यात आले आहे.
प्रा. वंदना परमार या जळगावतील ललिल कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रदर्शनाचे उदघाटन संगीताराजे निंबाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. शमा सुबोध सराफ., डॉ श्रध्दा चांडक, उज्वला बेंडाळे, सीमा देशमुख, संतोष पवार आदी मान्यवर उपस्थीत होते.
वंदना पवार यांनी सर्व चित्र आईल कलर मध्ये अमुर्त शैलीत काढलेली असून प्रत्येक चित्रात त्यांनी श्रमजीवी कष्टकरी महिला तीचा जीवनक्रम, संघर्ष अग्रभागी ठेवलेला आहे. वंदना पवार यांनी इंद्प्रस्थ भारती, हंस आदी मासीकांचे मखपृष्ठ तसेच कथा व कवितांसाठी स्केचेस काढलेली आहेत. चित्रकलेसाठी प्रोत्साहन त्यांना त्यांचे वडील प्रसिध्द छायाचित्रकार बन्सीलाल परमार यांच्या कडून मिळाल्याचे त्यांनी आर्वजून सांगीतले. या चित्रप्रदर्शनाला अनेकांनी भेट दिली व काही चित्र विकली गेलेली आहेत. वंदना पवार यांचे चित्रप्रदर्शन १५ फेब्रुवारी पर्यंत रसिकांसाठी खुले आहे. रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन पु. ना. गाडगीळ कला दालनाच्या वतीने व्यवस्थापक खेमचंद यांनी केले आहे.
पहा- आपल्या कलाकृतींबाबत वंदना परमार यांचे मनोगत.