जळगाव, प्रतिनिधी | येथील रहिवासी असलेले नाट्य-चित्रपट कलावंत आणि दिग्दर्शक हितेंद्र उपासनी यांना ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ तील ‘देवाप्पा’ या नकारात्मक भूमिकेसाठी त्यांना हे नामांकन मिळाले आहे.
हितेंद्र उपासनी यांनी हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमे, मराठी नाटके, हिंदी आणि मराठी मालिका, शॉर्ट फिल्म यातून अभिनय केला आहे. याशिवाय ‘बुर्झ्वागमन’ या शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारीत वास्तवदर्शी सिनेमाचे दिग्दर्शन, ‘ध्यासपर्व’ आणि ‘वृंदावन’ या सिनेमांचे सहाय्यक दिग्दर्शन अशी कामगिरी त्यांनी केली आहे. ‘देवाप्पा’च्या भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार मिळावा, यासाठी प्रेक्षकांनी ‘voot app’वर जावून वोटिंग करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. मत देण्याला कोणतीही मर्यादा नसून प्रत्येकजण कितीही मते देऊ शकतो.