जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांचे थोडा वेळापूर्वी जळगाव विमानतळावर आगमन झाले. राज्याचे ग्रामीण विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दि. २५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय ‘लखपती दीदी’ हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान हे उपस्थित राहणार आहे.