यावल येथील साठवण तलावाच्या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करा; गटनेते अतुल पाटील यांची मागणी

यावल प्रतिनिधी । यावल नगराध्यक्ष नौशाद तडवी यांनी केलेले अतिरिक्त साठवण तलाव भ्रष्टाचाराचे आरोप हस्यास्पद आहे. त्यावर भाजपाने या विषयाची चौकशी न करता नगराध्यक्षाना समर्थन म्हणजे ‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ असेच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया यावल नगरपारिषदचे गटनेते अतुल पाटील यांनी आज ३० सप्टेंबर रोजी १२ वाजता पत्रकार परिषदेत दिली.

यावल नगरपरिषदच्या माध्यमातून शहराला येणाऱ्या काळात पिण्याच्या पाण्याची उणीव भासु नये, या दृष्टीकोणातुन सत्ताधारी गटाचे गटनेते तथा नगरसेवक अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नौशाद तडवी  व नगरसेवकांनी मिळुन विकासाचा विधायक दृष्टीकोण समोर ठेवून शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा शर्तीचे प्रयत्न करून नगरपरिषदेला सुमारे १ कोटी ७६ लक्ष रुपयांचे अतिरिक्त साठवण तलावास मंजुरी मिळवली. सदरचे काम पुर्णत्वास आले असता, चार दिवसापुर्वी नगराध्यक्ष नौशाद तडवी व त्यांच्यासह चार नगरसेवकांनी जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांच्याकडे सदरचे साठवण तलावाच्या कामात मोठा भ्रष्टाचार असल्याचा लिखीत निवेदन दिले. याविषयाला आता राजकीय वळ्ण मिळाले असुन, काल भाजपाने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत या अतिरिक्त साठवण तलावात झालेल्या भ्रष्ठाचाराची चौकशी व्हावी या नगराध्यक्ष यांच्या मागणी समर्थन देण्यात आले. याच विषयाला घेवुन अतुल पाटील यांनी आज गुरूवार ३० सप्टेंबर रोजी १२ वाजता पत्रकार परिषद घेतली याप्रसंगी उपनगराध्यक्ष अभीमन्यु चौधरी, नगरसेवक प्रा . मुकेश येवले, राकेश कोलते, शेख असलम शेख नबी , समिर शेख मोमीन , नगरसेविका देवयानी महाजन , रेखा चौधरी,  पोर्णीमा फालक, शिला सोनवणे, कल्पना वाणी, रूख्माबाई भालेराव आदी उपस्थित होते.

 

नगराध्यक्षा नौशाद तडवी यांच्या संपुर्ण देखरेख व आदेशाव्दारे पुर्णत्वास आलेल्या तलावाची त्यांनीच भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करावी हे संपुर्ण विषय हायस्पद असल्याची माहीती या वेळी पत्रकार परिषदेत केली. या सर्व प्रकाराची उच्चस्तरिय न्यायलयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ही आपण जिल्हाधिकारी यांच्या कडे करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलतांना गटनेते अतुल पाटील यांनी दिली.

Protected Content