Home धर्म-समाज मुक्ताई पालखीचे पहूर येथे आगमन

मुक्ताई पालखीचे पहूर येथे आगमन

0
34

पहूर, ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान दिना’निमित्त येवला जिल्हा नाशिक येथून आलेल्या गंगागिरी महाराजांच्या पालखीचे येथे पहूर येथे आगमन झाले.

सालाबादाप्रमाणे वारकरी संप्रदायाने दिलेल्या दिंडीचा ठेवा जपत नाशिक जिल्ह्यातून निघालेल्या मुक्ताई पालखीचे, दिंडीचे भाविकांच्या वतीने पहूर येथे स्वागत करण्यात आले.

रणरणत्या उन्हाची पर्वा न करता ‘मुक्ताई, मुक्ताई; आदिशक्ती मुक्ताई’ असा जयघोष करत भगव्या पताका अन् टाळ मृदंग हाती घेऊन वारकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी झाली होते.


Protected Content

Play sound