भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील 72 खोली वाल्मीक नगर भागात मध्यरात्री गावठी पिस्तुलासह एकाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, (दि 31 जुलै) रोजी मध्यरात्री १२:35 वाजेच्या सुमारास भुसावळ शहरात 72 खोली वाल्मीक नगर भागात दोन इसम विना परवाना गावठी पिस्तूल बागळुन चोरी किवा जबरी चोरी करणाच्या उदेशाने फिरत असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ शंकर पाटील, पो.ना.दिपक जाधव, पो.काँ कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, सचिन पोळ,राहुल चौधरी,मंदार महाजन,बंटी कापडणे, म.पो.काँ मोनाली इसाने यांचे पथक लागलीच घटनास्थळी पोहचले. तेव्हा दोघं संशयित पोलीसांना बघताच तेथुन पळु लागले. तेव्हा त्यातील एक संशयितास पोलिसांच्या पथकाने यांनी काही अंतरावरच ताब्यात घेतले. तर दुसरा संशयित अंधाराचा फायदा घेत गल्ली बोळातून फरार झाला.
ताब्यात घेतेलेल्याचे नाव विशाल राजु टाक (वय-19 रा. जामनेर रोड 3 नं. पोलीस चौकी समोर, वाल्मीक नगर) असे असून फरार झालेल्या संशयिताचे नाव यशवंत राजपुत असे आहे. संशियत विशाल टाकची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला डाव्या बाजुस एक गावठी पिस्टल मिळाले. पिस्तुलाची मक्झीन काढुन पाहिले असता, त्यात दोन जिवंत काडतुस मिळून आले. दरम्यान, दोघं संशियत चोरी किवा जबरी चोरीसाठी गावठी पिस्तुल पिस्टल व दोन जिवंत काडतुस बागळतांना मिळुन आल्याने त्या दोघांना वर भु.बा.पेठ पो.स्टे ला भाग 5 गु.र.न 418 /19 भा.द.वि कलम 401,34 सह भारतीय हत्यार कायदा 1959 चे कलम आर्म अँक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयाचा तपास पो.हे.काँ सुनिल जोशी करीत आहे