तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अमनकुमार वर्माने पटकावला तृतीय क्रमांक

c546346e 19a1 4ae4 8d11 bed3e451f4f7

 

धरणगाव (प्रतिनिधी) येथील बालकवी ठोंबरे विद्यालयात झालेल्या १७ वर्ष आतील गटातील बुद्धिबळ स्पर्धेत गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलचा विद्यार्थी अमनकुमार वर्मा (इ. ८ वी) या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक पटकावला.

या स्पर्धेत एकूण विविध शाळेतून २० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. एकूण ५ पैकी ४ सामने जिंकून अमनने तृतीय क्रमांक मिळविला. अमनने आता जिल्हास्तरावर मजल मारली आहे. त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी सत्कार केला. त्याचे वर्गशिक्षक लक्ष्मण पाटील व शाळेतील सर्व शिक्षकवृंदांनी अमनला शुभेच्छा दिल्या. त्याला क्रीडाशिक्षक अमोल सोनार यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content