जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी|मरीमाता मंदिराजवळ नातेवाईकांना भेटण्यासाठी आलेल्या तरुणाने गाडीच्या मोबाईल बॉक्स ठेवलेला मोबाईल लांबवल्याची घटना बुधवारी २८ रोजी सायंकाळी ७.३० घडली होती. मोबाईल चोरणारा संशयिताला रिधूरवाडा येथून गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओंकार योगेश सोनवणे (रा. रिधूर वाडा) अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील सुनंदिनी पार्कमध्ये सागर राजेश गवळी हा तरुण वास्तव्यास आहे. त्याच्याकडे (एमएच १९, डीवाय ६६४८) क्रमांकाची दुचाकी आहे. बुधवार २८ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास मरीमाता मंदिराजवळ मध्यप्रदेश राज्यातील खंडवा येथून वरात आलेली असल्याने त्यांना भेटण्यासाठी सागर गवळी हे गेले होते. यावेळी त्यांना मोबाईल गाडीच्या डिक्कीत ठेवलेला होता. नातेवाईकांना भेटून आल्यानंतर ते दुचाकीजवळ गेले असता, त्यांना ओंकार सोनवणे हा त्यांच्या गाडीच्या मोबाईल बॉक्स मध्ये ठेवलेला मोबाईल चोरुन नेत असतांना दिसला. दरम्यान, सागर गवळी यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनके, राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे, मुकुंद गंगावणे यांच्या पथकाने संशयित ओंकार सोनवणे याला रिधरवाडा येथून गुरूवारी २९ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता अटक केली. ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.