लोखंडी तलवार घेवून दहशत माजविणाऱ्याला अटक

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हिरापूर रोडवरील खानदेश बाजार मंगल कार्यालय परिसरात सोमवारी २९ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड वाजता लोखंडी तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका तरुणाला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पहाटे ४ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुनेद शेख शकील वय-२७, रा. हिरापूर रोड, खान्देश बाजार मंगल कार्यालयात जवळ चाळीसगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील हिरापूर रोडवरील खानदेश बाजार मंगल कार्यालय परिसरात सोमवारी २९ एप्रिल रोजी मध्यरात्री दीड महिन्याच्या सुमारास संशयित आरोपी जुनेद शेख शकील हा हातात लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवून माजवीत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी जुनेद शकील याला अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राकेश महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी जुनेद शेख शकील वय-२७, रा. हिरापूर रोड चाळीसगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र पाटील हे करीत आहे.

Protected Content