Home क्राईम फावड्याच्या दांड्याने गळा दाबून तरूणाचा खून करणाऱ्याला अटक

फावड्याच्या दांड्याने गळा दाबून तरूणाचा खून करणाऱ्याला अटक


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फावड्याच्या दांडने गळा दाबून तरूणाचा खून करणाऱ्या फरार संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चिंचखेडा गावातून अटक केली आहे. त्याने खूनाची कबुली दिली असून जामनेर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

नथ्थू काळू सुरळकर वय २८ रा. चिंचखेडा ता .जामनेर असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. तर शाम फकीरा ठाकरे वय 30 रा.गंगापूरी ता. जामनेर असे मयत तरूणाचे नाव आहे.

 

२५ जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गंगापूरी गावातील एक दाम्पत्य फलोद्यानात रानतुळस घेण्यासाठी गेले असता, पळसाच्या झाडाखाली मृतदेह आढळला होता. याबाबत दाम्पत्याने याठिकाणचे वॉचनमन नथ्थू सुरळकर यास सांगितले होते. सुरळकर याने  त्याच्या जोडीदाराला फोन केला होता. घटनेची माहिती मिळाल्यावर जामनेर पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात हलविला होता.  मयत हा गंगापूर गावातील शाम फकीरा ठाकरे असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी गुन्ह्यांची गंभीर दखल घेत संशयिताचा शोध घेवून त्याला अटक करण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. तसेच जामनेर पोलिसांकडूनही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरु होता. तब्बल २० दिवसांच्या तपासानंतर स्थानिक गुन्हेच्या पथकाने संशयिताबाबत माहिती निष्पन्न केली. मृतदेह ज्या दिवशी आढळला त्या दिवशी घटनास्थळी असलेला वनविभागाचा वॉचमन नथ्थू सुरळकर यानेच हा खून केल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली.

 

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक जालींदर पळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील दामोदरे, जयंत चौधरी, लक्ष्मण पाटील, संदीप सावळे, रणजित जाधव, किशोर जाधव, विनोद पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने गुरुवारी चिंचखेडा गावातून नथ्थू सुरळकर यास ताब्यात घेतले. दरम्यान, मयत शाम ठाकरे हा झोपडीजवळ आला, दारुच्या नशेत तो विनाकारण आई वडीलांवरुन शिवीगाळ करत होता. तसेच मला मारण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मी रागात येवून माझ्याजवळील फावड्याच्या दांडक्याने शामचा गळा दाबून त्याला मारुन टाकल्याची कबूली दिली संशयित नथ्थू सुरळकर याने पोलिसांना दिली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित नथ्थू सुरळकर यास जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Protected Content

Play sound