Home Cities जळगाव शेंदुर्णीतून घरफोडीतील फरार आरोपीला अटक

शेंदुर्णीतून घरफोडीतील फरार आरोपीला अटक


acb9119a ce46 43b0 98d8 8d718f281324
 

जळगाव (प्रतिनिधी) घरफोडीच्या गुन्हात फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शेंदुर्णी ता.जामनेर येथे सापळा रचून अटक केली आहे.

 

 

या संदर्भात अधिक असे की, शेंदुर्णी ता.जामनेर येथील संदीप अर्जुन गुजर (वय ३१) हा जिल्हापेठ पोलीस स्थानकात दाखल गुरन ५३/१५ भादवी ४५४ आणि ३८० या कलमान्वये गुन्हा दाखल होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबर मिळाली की,संदीप गुजर हा गावात आलेला आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका विजय पाटील, राजेंद्र पाटील अनिल इंगळे, सुरेश महाजन,संतोष मायकल, सचिन महाजन,अशोक पाटील यांनी शेंदुर्णी गावात वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचला. त्यानुसार संदीप गुजर अलगद पोलिसांच्या जाळ्यात अटकला. संबंधित आरोपीस पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound