आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट

Praniti Shinde

 

सोलापूर (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या जिल्हा न्यायालयात तारखेला हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार प्रणिती शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घालून पोलिस कर्मचाऱ्याला जखमी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

 

२ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली होती. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन केले होते. औषधोपचारावर झालेली दरवाढ रद्द करा अशी मुख्य मागणी आंदोलकांची होती. कार्यकर्ते पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गाडीला घेराव घालण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत पोलीस कर्मचारी खाली पडून जखमी झाला होता. यानंतर पोलिसांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासहित इतरांवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकऱणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची तारीख सोलापूर जिल्हा न्यायालयात होती. न्यायालयाने दिलेल्या तारखेला आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे हे हजर राहिले नाही. त्यामुळे जिल्हा न्यायालयाने आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढले, तर न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

Protected Content