पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निपाणे प्रकरणात अत्याचाराचा गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटले तरी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब (मनोहर) पाटील यांच्यासह अकरा जणांना राजकीय दबावापोटी अटक केली जात नाही. सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, पोलिस उपअधिक्षक भारत काकडे, तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. दरम्यान, दोन दिवसात अटक न केल्यास आंदोलन तीव्र होऊन पाचोऱ्यासह तालुका बंदची हाक देण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
निपाणे ता. पाचोरा येथील अॉट्रासीटीचा गुन्हा दाखल होऊन दहा दिवस लोटले, तरी शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब (मनोहर) पाटीलसह अकरा जणांना राजकीय दबावामुळे अटक केली जात नाही. सर्व आरोपींना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी पाचोरा येथे समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे, बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद अडकमोल, जिल्हा उपाध्यक्ष जाकीर कुरेशी, जिल्हा सचिव राजु महाले, नगरसेवक खंडु सोनवणे, नागराज धिवरे, सचिन सोनवणे, भुषण मोरे, आर. पी. आय. चे ता. अध्यक्ष विनोद अहिरे, कोषाध्यक्ष दिपक दांडगे, शहर उपाध्यक्ष रमेश रोकडे, ता. सचिव प्रकाश भिवसने, ता. उपाध्यक्ष रामदास गायकवाड, नगरसेवक अशोक मोरे, राजू महाले यांच्या नेतृत्वाखाली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पोलीस ठाण्यात मोर्चा काढण्यात आला. यानंतर मोर्चा कर्त्यांतर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, पोलिस उपअधिक्षक भारत काकडे, तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आरोपींना पुढील दोन दिवसात अटक न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असून त्यासाठी ठिया आंदोलन व पाचोरा शहरासह वेळ पडल्यास तालुका ही बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निपाणे ता. पाचोरा येथे दि. १२ सप्टेंबर रोजी वृद्ध दलित महिलेच्या अंत्यविधीसाठी सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी येथील मनोहर (रावसाहेब) पाटील, रोशन पाटील, राजेंद्र पाटील, त्रंबक पाटील, मयूर पाटील, गोकुळ पाटील, निलेश पाटील, शांताराम पाटील, भैय्या पाटील, अजबराव पाटील, वैभव पाटील यांचेवर समाधान धनुर्धर यांनी मज्जाव केल्याने वरील संशयित आरोपींविरुद्ध अॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल होऊन दहा दिवस लोटले तरी अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विनोद अडकमोल, सुनिल शिंदे, दिपक मोरे, रामराव साठे, प्रविण ब्राम्हणे, सागर अहिरे, प्रकाश इंगळे, राहुल कदम, अमोल पवार, सागर अहिरे, र्ऋषीकेश सोनवणे, सुमित खर्चाणे, भिमराव लहासे सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
पिडीत कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही – पोलीस उपाधिक्षक भारत काकडे
निपाणे येथील प्रकरणात पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. याबाबत असून चौकशी सुरू असून एफआयआर दाखल केल्यानंतर चार्ज सीट दाखल करण्याचे काम सुरू आहे. सदरचा गुन्हा हा पाच वर्षाआतील शिक्षेचा आहे यामुळे तातडीने अटक करता येणार नाही. संशयित आरोपींना दोन दिवसांत नोटिसा बजावल्या जातील त्यांनी नोटिसाचे उत्तर न दिल्यास व नोटिसाचा अवमान केल्यास अटक करण्याचे काम सोपे होणार आहे.