जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी यांनी ऑक्टोबर महिन्यात दोन वर्षांपासून हद्दपार केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत शनिवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता एकाला तुकाराम वाडी तर दुसऱ्याला रामदेवबाबा मंदीर परिसरातून अटक केली आहे. दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. निशांत प्रताप चौधरी (वय-२०, रा. शंकरराव नगर, जळगाव ) आणि स्वप्नील उर्फ गोलू धर्मराज ठाकूर (वय-२०) दोन्ही रा. शंकरराव नगर, जळगाव असे अटक केलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे नाव आहे. दोघांकडून लोखंडी सुरा हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जिल्हाधिकारी यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार निशांत चौधरी आणि स्वप्नील ठाकूर यांना दोन वर्षांसाठी ऑक्टोबर महिन्यात हद्दपार करण्याचे आदेश केले होते. त्यांना पोलीसांनी हद्दपार देखील केले होते. दरम्यान, यातील निशांत चौधरी हा तुकाराम वाडी परिसरात आणि दुसरा गुन्हेगार स्वप्निल ठाकूर हा रामदेव बाबा मंदीर परिसरात हातात सुरा घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस ठाण्याचे शोध पथकाला दोघांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पोलीस पथकाने कारवाई करत शनिवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता तुकाराम वाडी परिसरातून गुन्हेगार निशांत चौधरी याला अटक केली तर दुसऱ्या पथकाने गुन्हेगार स्वप्निल ठाकूर याला रामदेव बाबा मंदीर परिसरातून अटक केली. दोघांकडून लोखंडी सुरा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोकॉ नितीन ठाकूर व पोकॉ मुकेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखाल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोहेकॉ रामकृष्ण पाटील, पोना सचिन पाटील, योगेश बारी, सुधीर सावळे, किशोर पाटील, पो.कॉ. मुकेश पाटील, नितीन ठाकुर, ललीत नारखेडे, राहुल रगडे, विशाल कोळी, छगन तायडे, किरण पाटील अशांनी केली आहे.