जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जामनेर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढून अपमान केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुका अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अरविंद चीतोडिया यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक यांना निवेदन देऊन आव्हाड यांच्या विरुद्ध कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे जाऊन महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला पोस्टर फाडला असून महामानवाचा अपमान केला आहे. या घटनेच्या तीव्र निषेध जामनेर तालुका अजित पवार गट राष्ट्रवादी तर्फे करण्यात आला असून लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी अजित पवार गट राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया, सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष अरविंद तायडे, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष किशोर झाल्टे, राष्ट्रवादी ओबीसी शहराध्यक्ष दत्तात्रय नेरकर, जिल्हा उपाध्यक्ष मधुकर शिंदे, तालुका उपाध्यक्ष पंडित नाईक, माजी विद्यार्थी तालुकाध्यक्ष आदित्य गायकवाड, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष सुनील सुरवाडे, गणेश राठोड, गोकुळ दांडगे, रंगनाथ सुरवाडे, आकाश नवघरे, आकाश इंगळे, जीवन मोरे, विजय मोरे आदि उपस्थित होते.