पंढरीच्या वारीसाठी रावेर आगारातून विशेष बसेसची व्यवस्था

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| विठ्ठलाच्या दर्शनासाठी रावेर आगारातून खानापुर, चिनावल आणि इतर गावातून विशेष बसेसची व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत.

आगामी आषाडी एकादशी निमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी रावेर आगारातून स्थानिक गावांमधून मागणीनुसार जादा बसेस पंढरपूरला पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

या योजनेत मस्कावद, पूनखेडा, पातोंडी, निरुड, आणि खिरोदा येथून प्रत्येकी एक बस पंढरपूरला जाणार आहे. तसेच, खानापुर, चिनावल, रसलपुर आणि रझोदा येथून प्रत्येकी तीन बसेस बुक करण्यात आलेल्या आहेत. या बसेस ठरलेल्या वेळेनुसार पंढरपूरकडे रवाना होणार आहे.
रावेर आगार प्रमुख विजय पाटील यांनी पत्रकारांना सांगितले की, येत्या काही दिवसांत लांब पल्याच्या बसेस रद्द करून पंढरपूरला दररोज विशेष बसेस पाठवण्यात येणार आहेत. यामुळे वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी अधिक सोयीचे आणि सुलभ प्रवास होईल.

Protected Content