अर्णव जोशीला राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत दुहेरी यश

पहूर, ता.जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । गोवा येथे राष्ट्रीय स्केटिंग स्पीड रेस व स्केटिंग रिले स्पर्धा २८ जानेवारी रविवार रोजी घेण्यात आली. या स्पर्धेत पहूर येथील रहिवासी व लार्ड गणेशा इंग्लिश मेडियम स्कुलचा इयत्ता सहावीचा विद्यार्थी अर्णव जोशी याने चमकदार कामगिरी करून स्पीड रेस स्पर्धेत तृतीय व रिले ग्रुप मध्ये व्दितीय क्रमांक पटकावत एक सिल्वर व एक ब्रांझ पदक पटकाविले आहे.

विशेष म्हणजे मे महिन्यात श्रीलंका येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. अर्णवला क्रीडा शिक्षक आनंद मोरे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभलेले आहे. अर्णव हा सीए विनोद जोशी यांचा पुतण्या तर पत्रकार मनोज जोशी यांचा चिरंजीव आहे.

Protected Content