मुंबई प्रतिनिधी । भाजपचे डोंबिवली शहर उपाध्यक्ष धनंजय कुळकर्णी यांच्या दुकानातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
डोंबिवलीतील महावीर नगरमध्ये धनंजय कुलकर्णी यांच्या मालकीच्या दुकानात कल्याण गुन्हे शाखेला मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळून आला. हा संपूर्ण शस्त्रसाठा पोलिसांनी ताब्यात घेतला. यामध्ये अनेक विदेशी पिस्तुलांसह, चाकू, सुरे, तलवारी, कुर्हाडींचा समावेश आहे. भाजपा पदाधिकार्याच्या दुकानात शस्त्रसाठा सापडल्यानं शहरात मोठी खळबळ उडाली आहे. याबद्दल अद्याप भाजपाच्या एकाही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही. या कारवाईत पोलिसांनी स्टील तसंच पितळी धातूचे फायटर्स, बटण चाकू, चॉपर्स, तलवारी, गुप्त्या, सुरे, कुर्हाडी, कोयता आणि एयरगन जप्त केल्या असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.