अरेच्चा आता घरपोच मिळणार डिझेल !

धुळे । सर्वत्र ऑनलाईनचा बोलबाला सुरू असतांना आता येथे चक्क ऑनलाईन डिझेल विक्री सुरू झाली असून यामुळे ग्राहकाला घरपोच डिझेल मिळणार आहे. जळगावचे खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या हस्ते या सेवेस आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे.

सरवड फाटा ता. जि. धुळे येथील युवा उद्योजक डॉ.राकेश दिलीप जगताप यांच्या प्रयत्नांनी धुळे शहरवासियांसाठी प्रथमच ऑनलाइन डिझेल डिलिव्हरी सुविधा सुरू केली आहे. ग्राहक हा विक्रेत्याकडे न जाता विक्रेत्याने ग्राहकांपर्यंत जावून त्याला सेवा दिली पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत सेवा देणार्‍या या उपक्रमाची सुरुवात होत आहे. आपण या उपक्रमाला शुभेच्छा देतो आणि आर आर पेट्रोलियम संचालक राकेश जगताप व त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे उपस्थित अधिकारी यांचे मनापासून अभिनंदन करतो असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस तथा सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचे स्टँडिंग कमिटी सदस्य खासदार उन्मेषदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

गणेश चतुर्थीच्या औचित्यसाधत खान्देशवासीयांसाठी धुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी डिझेल ऑनलाईन सुविधेचा शुभारंभ आज धुळ्यातील आर.आर.पेट्रोलियम भारत,पेट्रोलियम पेट्रोल पंप सरवड फाटा पंपांचे डीलर डॉ.राकेश दिलीप जगताप यांनी सदर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचे लोकार्पण खासदार उन्मेषदादा पाटील यांनी केले. याप्रसंगी जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार, पंकज चौधरी (नगरसेवक अमळनेर),दिलीप तात्यासाहेब जगताप (माजी नगराध्यक्ष धुळे), उद्योजक राहुल दिलीप जगताप, अमित राय ( भारत पेट्रोलियम धुळे सेल्स) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आज या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला.

खान्देश वाशीयांसाठी धुळे जिल्ह्यातील नागरिकांसाठी डिझेल ऑनलाईन सुविधा सुरू झाली आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या जमान्यात आता डिझेल देखील ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होत आहे. ही सुविधा भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड धुळे जिल्ह्यामध्ये मोबाईल डोअर डिलिव्हरी ब्राउझर फ्युल कार्ट या नावाने सुविधा सुरू केली आहे. याअंतर्गत रिपोस अ‍ॅपच्या माध्यमातून किंवा ७७१९९७०५५५ या नंबरवर कॉल करून सदर डिझेल मागवता येऊ शकते.

या सुविधेचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहकांना कमीत कमी शंभर लिटर डिझेल उपलब्ध होऊ शकेल व डिलिव्हरी सुविधा उपलब्ध होणार आहे.ज्यात हॉस्पिटल्स, बँक, हॉटेल्स,फॅक्टरी, कमर्शियल इंडस्ट्रियल प्रोजेक्ट, कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट,स्टोन क्रेशरर्स जनरेटर्स यांच्यासाठी देखील ही सुविधा अतिशय फायदेशिर ठरणार आहे. या आर.आर.पेट्रोलियम भारत, पेट्रोलियम पेट्रोल पंपाची चारहजार लिटर इतकी क्षमता असून ग्राहकांसाठी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत सदर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

Protected Content