मँचेस्टर वृत्तसंस्था । आयसीसी वर्ल्ड कप 2019 च्या स्पर्धेसाठी भारतीय संघ लंडनमध्ये दाखल झाले होते.
मात्र, भारतीय संघाचा वर्ल्ड कप स्पर्धेच्या प्रवास हा उपांत्य फेरीपर्यंतच राहिला. न्यूझीलंडने 18 धावांनी भारतावर विजय मिळवत, सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न तुटल्यानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर त्याचे शल्य दिसत होते. भारतीय संघाला सातत्य राखण्यास अपयश आले आहे.