चोपडा येथील ऑक्सफर्ड स्कुलमध्ये विठुनामाचा गजर

a5d0cc33 3821 4379 a139 6fd6c4d9d0b3

चोपडा प्रतिनिधी । ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी’, ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ यांसारख्या नामाचा गजर करत ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नुकतीच आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य प्रवीण पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुखमाईच्या प्रतिमेचे व ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांचे पूजन करण्यात आले. शिक्षिका उज्वला भट यांनी देवशयनी एकादशीची महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. विठ्ठल-रूखमाई आणि वारकऱ्यांच्या रुप परिधान केलेल्या चिमुकलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. तसेच यावेळी मनुश्री रनाळकर हिने ‘कानडा राजा पंढरीचा’ हे तर पारस जैन व श्रावणी शिंदे यांनी भजन सादर केले. ‘तू माय मी लेकरू’ हे भावगीत सोहम पाटील याने सादर केले. तर ‘माऊली माऊली’ या गीतावर सातवीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य करुन, संत गोरा कुंभार यांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. ‘रखुमाई रखुमाई’ या गीतावर तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. विद्यार्थी व शिक्षकांनी या भक्तीपूर्ण वातावरणाचा मनमुराद आनंद लुटला. समूह नृत्य शिकविण्यासाठी विद्यालयातील नृत्य शिक्षिका दिपाली पाटील यांनी परिश्रम घेतले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जितेंद्र सोनार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर वृदांनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content