वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी यावल नगर परिषदेला निधी मंजूर

यावल,  प्रतिनिधी ।  येथील नगर परिषदेला आमदार शिरीष चौधरी यांनी वैशिष्ट्यपूर्ण विविध विकास कामांसाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत १  कोटी २०   लाख रुपयांचा निधी मंजूर  करण्यात आला असून  तसे पत्र नगर परिषदला प्राप्त झाले आहे.

 

मागील आठवडयात यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष चौधरी यांनी रावेर आणि  फैजपुर नगर परिषदच्या विकास कामांसाठी ४ कोटी ९२ लाखाचा निधी मंजुरीची घोषणा केली होती. या घोषणेनंतर संपूर्ण यावल शहरवासीयांच्या नजरा या आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे लागल्या होत्या.  आमदार चौधरी यांच्या मतदारसंघात येणारे यावल शहर हे अत्यंत महत्वाचे  शहर आहे.  या शहरात  देखील विकासकामे व्हावीत या दृष्टीकोणातुन आमदार चौधरी यांनीवैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी १ कोटी २० लाखांचा भरीव निधी मंजूर केला आहे.   दि ३ मे  रोजी तसे पत्र महाराष्ट्र शासनाचे अव्वर सचिव विवेक कुंभार यांनी यावल नगर परिषदेला पाठविला आहे. लवकरच शहरातील प्रलंबित विकास कामांना सुरूवात होणार आहे. या निधीमुळे यावल नगर परिषदच्या विकास कामांना गती व दिशा मिळेल.  हा निधी मंजुर करण्याकरीता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले तथा माजी नगराध्यक्ष तथा गटनेते अतुल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने अखेर या निधीस मान्यता मिळाली आहे.  या निधीचा फायदा पावसाळ्यापुर्वी होणाऱ्या विकास कामावर व्हावीत अशी अपेक्षाकृत मागणी यावल शहरवासीयांकडुन व्यक्त करण्यात येत आहे.

Protected Content