यावल प्रतिनिधी । तालुक्यातील प्रसिद्ध मनुदेवी तीर्थक्षेत्राला येथील दोन महत्वाच्या विकास कामासाठी निधीची मंजुरी तसेच फैजपूर उपविभागातील कोविड समस्या निराकरण व उपाययोजना संदर्भात फैजपूर प्रांत अधिकारी कैलास कडलग आणि जिल्हा नियोजन अधिकारी-जळगाव प्रतापराव पाटील यांची सायकल फेरीसह ग्रेट भेट भेट घेऊन त्यांचे विश्वस्त व भाविकांनी विशेष आभार मानण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो.
पंचकृषितील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.मनुदेवी (तीर्थक्षेत्र) ता.यावल येथील विकासकामांना निधी मंजूर केल्याबद्दल प्रतापराव पाटील(जिल्हानियोजनअधिकारी )जळगाव यांची भेट घेऊन त्यांचे विश्वस्त व भाविकांनी विशेष आभार मानण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो होतो.मनुदेवी यात्रास्थळ संदर्भातली दोन महत्त्वाची विकासकामांसाठी निधी मंजूर करून संबंधित यंत्रणांना ही कामे कार्यान्वित करण्यासाठी क्रयशक्तीचे पाठबळ दिल्याबद्दल प्रतापराव पाटील आणि अर्थातच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या प्रत्यानातुन मनुदेवी आणि या व्यतिरिक्त जिल्ह्यातील अश्या अनेक विकासनिधी मंजुरीच्या कामाची खरी मुहुर्तमेढ ही प्रतापराव पाटील यांच्या सायकल फेरीत दडलेली आहे…उल्लेखनीय बाब म्हणजे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत जिल्हा नियोजनाच्या संदर्भातली कामे प्रतापराव पाटील सर अत्यंत कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम पद्धतीने करतातच. परंतु आपला सायकलिंगचा छंद जोपासत कामाच्या प्राधान्यक्रमानुसार व संबंधित स्थानिक नेत्यांच्या व यंत्रणेच्या मागणीनुसार आपल्या कार्यक्षेत्रातील विकास कामांसाठी निधीची किती,कधी व कशी आवश्यकता आहे याचा अप्रत्यक्ष सर्व्हेच सायकलींच्या माध्यमातून करत असतात असे म्हणावे लागेल.
चोपडा मतदारसंघाच्या आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या आपल्या मतदारसंघात येणाऱ्या तीर्थक्षेत्राच्या विकासकामांच्या मागणीतून -डोंगरी विभाग विकास कार्यक्रम 2020-21 योजने अंतर्गत मनुदेवी रस्ता काँक्रिटीकरण कामी 380000 चा निधी मंजूर करण्यात आला..यासोबतच यात्रास्थळांच्या (तीर्थक्षेत्र) विकासासाठी (जिल्हा परिषदांना अनुदान) यात्रास्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम 2021 अंतर्गत श्री मनुदेवी देवस्थान येथे भक्तनिवास बांधकाम कामासाठी 3750000 इतका निधी मंजूर करण्यात आला. म्हणून प्रतापराव पाटील यांची सायकल फेरी आमच्या भागात अशीच वारंवार होत राहो ही अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केल्या आहेत.
तसेच फैजपूर उपविभागातील कोविड नियंत्रणासाठी लागणारे आवश्यक साधने व यंत्रणा कार्यान्वित करणे, लोकसहभागातून ऑक्सीजन सिलेंडर व इतर व्यवस्था उपलब्ध करून देण्यासंदर्भात आमचे उपविभागीय अधिकारी कैलास कडलक सर हे प्रयत्नशील आहेतच …याव्यतिरिक्त जिल्हा नियोजन समितीमार्फत अजून काय करता येईल ज्यातून फैजपुर उपविभागाची कोविड परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळता येईल यासाठी आदरणीय प्रतापराव पाटील आणि कैलासजी कडलग यांची भेट आणि त्या संदर्भातील चर्चा महत्त्वाची ठरली .