मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना सरकारनं क्लीनचीट दिली होती. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांची पोलिसांच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आल्यानं चर्चा सुरु आहे.
देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विरोधी नेत्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. या फोन टॅपिंग प्रकरणाची जबाबदारी राज्य गुप्तचर विभाग प्रमुख या नात्यानं रश्मी शुक्ला यांच्यावर दोन एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. यांपैकी एक एफआयआर पुण्यात तर दुसरी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती