Home धर्म-समाज राजेंद्र चौधरी यांची ‘प्रीतगंध फाउंडेशन’ उपसचिवपदी नियुक्ती

राजेंद्र चौधरी यांची ‘प्रीतगंध फाउंडेशन’ उपसचिवपदी नियुक्ती

0
42

सावदा ता.रावेर प्रतिनिधी | रोझोदा येथील राजेंद्र चौधरी यांची मुंबईतील प्रीतगंध फाउंडेशन या सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेच्या उपसचिव पदावर नुकतीच नियुक्त करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष संतोष महाडेश्वर यांनी एका पत्रकाद्वारे नुकतेच कळविण्यात आले आहे.

रावेर तालुक्यातील रोझोदा येथील राजेंद्र तुळशीराम चौधरी यांचे सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील योगदानाच्या कार्याची दखल घेऊन मुंबईच्या प्रीतगंध फाउंडेशन संस्थेच्या उपसचीव पदावर दि.१९ डिसेंबर २०२१ ते २० डिसेंबर २०२४ या वर्षांसाठी नियुक्त करण्यात येत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष संतोष महाडेश्वर यांनी दिलेल्या पत्रकाद्वारा कळविण्यात आले आहे.

राजेंद्र चौधरी हे मुंबईच्या बोरीवली येथील हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयात वीस वर्षांपासून कार्यरत असून ‘मुंबई ध्यास कवितेचा काव्य मंच’चे ते सचिवदेखील आहेत. ‘अमृतवेल’ हा त्यांचा स्वलिखित कविता संग्रह असून ‘दिवा तुळशीरामाचा’ हा दुसरा कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
मुंबईतील निसर्ग उद्यान, धारावी येथे १९ डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या शिवानी साहित्यिक मंचच्या वतीने होणाऱ्या कविसंमेलनाप्रसंगी प्रीतगंध फाउंडेशनच्या वतीने राजेंद्र चौधरी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने शुभांगी काळभोर व अभिनेत्री विनीता काळे यांच्या उपस्थित शाल, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करुन गौरविण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound