यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे (अप्पा) यांची काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे जळगाव जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कमेटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेवरून व देशाचे युवा नेतृत्व खासदार राहुल गांधी व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांच्या सक्षम नेतत्वाखाली कार्य करणारे व पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले जिल्हा परिषदचे माजी गटनेते व काँग्रेस कमेटीचे यावल तालुका अध्यक्ष प्रभाकर नारायण सोनवणे (अप्पा) यांच्या पक्षासाठी केलेल्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदाची निवड करून त्यांना जिल्हा पातळीवर कार्य करण्याची संधी दिली आहे
प्रभाकर सोनवणे त्यांच्या निवडीचे पक्षाच्या वतीने शेखर पाटील, हाजी शब्बीर खान, हाजी गप्फार शाह, मारूळ सरपंच सैय्यद असद अली, जावेद अली, वढोदा सरपंच संदीप सोनवणे, उमेश जावळे, जलील पटेल, सतिष पाटील, कदीर खान, अनिल जंजाळे, असलम शेख नबी, मनोहर सोनवणे, गुलाम रसुल मेंबर, रमेश पाटील, सैय्यद युनुस सैय्यद युसुफ, फैजान शाह, विवकी गजरे यांनी स्वागत केले .