भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीनुसार आमदार किशोर पाटील यांच्या मार्गर्शनाखाली सजय गांधी निराधार अनुदान योजना समितीत तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक अशासकीय प्रतिनिधी सदस्य पदी पत्रकार नितीन कन्हैयालाल महाजन यांची निवड जिल्हाधिकारीच्यां वतीने करण्यात आली आहे.
नितीन महाजन यांनी अभाविप महाराष्ट्र राज्य कार्यकारणी सदस्य, महाराष्ट्र माळी महासंघ व्यापारी जिल्हाअध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार संघ संचलित भडगाव तालुका पत्रकार संघ प्रसिद्धी प्रमुख, अध्यक्ष आधारस्तंभ फाऊंडेशन, उपाध्याश व्यापारी संघ भडगाव, भडगाव तालुका वकील संघ सदस्य, सचिव महात्मा फुले युवा मंच, महात्मा ज्योतिबा फुले बहुउददेशीय संस्था भडगाव, अशी विविध पदे भूषवली आहेत त्यांचा विविध सांस्कृतिक, सामाजिक कामात सहभाग असतो.