मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘युवा क्रांती फौंडेशन’ अंतर्गत ‘पोलीस मित्र’च्या ‘महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष’पदी निता शिवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘युवा क्रांती फौंडेशन’ अंतर्गत ‘पोलीस मित्र महाराष्ट्र’चे संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव रविंद्र सूर्यवंशी आणि संचालक तथा राष्ट्रीय अध्यक्ष अमरजी बेंद्रे, संचालक तथा राष्ट्रीय कोषाध्यक्ष गणेश आदमाने यांच्या सहमतीने व महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता भामरे, महिला संपर्क प्रमुख जयश्री इंगळे यांच्या शिफारशी वरून निता शिवराज पाटील यांची ‘महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा’ म्हूणन नियुक्ती करण्यात आली आहे.
‘युवा क्रांती फौंडेशन’ अंतर्गत ‘पोलीस मित्र’, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार’ क्षेत्रात स्वगत करण्यात येत असून त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.