जिल्हयातील मतदान केंद्रावर १७ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करीता जळगाव जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघात मतदान ड्युटी करीता १७ हजार ८२१ पुरुष व महिला कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
त्यात मतदान केन्द्राध्यक्ष पुरुष ४२६७, मतदान केन्द्राध्यक्ष महिला ४६ असे एकूण ४३१३ , प्रथम मतदान अधिकारी पुरुष ४२६७ प्रथम मतदान अधिकारी महिला ४६ असे एकूण ४३१४, इतर मतदान अधिकारी पुरुष ४२३४ , इतर मतदान अधिकारी महिला ७९ असे एकूण ४३१३ ओ पी ओ २ पुरुष ३७५ महिला ४५६१ असे एकूण ४९३६ तर राखीव २२७७ असे एकूण १७ हजार ८२१ कर्मचारी मतदान ड्युटी करीता नियुक्त करण्यात आले आहेत.

Protected Content