नारी शक्ती पुरस्काराकरीता 7 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

nari shakti puraskar

 

जळगाव (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला, संस्था, कंपन्या यांना नारी शक्ती पुरस्कार दिला जाणार आहे. 8 मार्च या जागतिक महिला दिनी एकूण 40 नारी शक्ती पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहेत. नारी शक्ती पुरस्काराकरीता 7 जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुरस्कारासाठीचे प्रत्येक वर्गवारीसाठी नामांकने विवरणपत्र 1 व विवरणपत्र 2 सह केंद्र शासनास सादर करावयाचे आहेत. प्रत्येक पुरस्काराचे स्वरुप, त्याकरिताचे कार्य, त्याबाबतची माहिती, मार्गदर्शक सुचनांमध्ये देण्यात आलेली आहे. सन 2019-20 या वर्षाकरीता सदर पुरस्कारासाठी पात्र महिला कार्यकर्त्या, स्वयंसेवी संस्था, कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग इत्यादिंकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. शासन पत्रात नमुद मार्गदर्शक सुचनेनुसार नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्जदाराने अर्ज/नामनिर्देशन योग्य त्या कागदपत्रांसह केवळ ऑनलाईन पध्दतीनेच केंद्र शासनाचे www.narishaktipuraskar.wcd.gov.in/www.wcd.nic.in या संकेतस्थळावर 7 जानेवारी 2020 पर्यंत भरावयाचे आहेत.

 

केवळ ऑनलाईन पध्दतीने केलेले अर्जच स्वीकारले जातील. तसेच प्रस्तावातील अटी, शर्ती व विहीत नमुन्यातील फॉर्मसाठी सदर पुरस्काराची नियमावली व निकष केंद्र शासनाच्या www.narishaktipuraskar.wcd.gov.in/www.wcd.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, (0257-2228828) आकाशवाणी चौक, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जळगाव यांचेशी संपर्क साधावा. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Protected Content