जळगाव प्रतिनिधी । वाघूर धरण विभाग, जळगाव कार्यक्षेत्रातील वाघुर डावा कालवा व उजवा कालवा तसेच कालवा उपसा व जलाशय उपसा यावरील प्रकल्पावर जेथे शक्य असेल तेथे कालव्याव्दारे (प्रवाही) तसेच अधिसुचित/अनाधिसुचित लाभक्षेत्रातील नदी, नाले व इतर जलाशयातून उपसा सिंचनाने पाण्याचा उपयोग घेणाऱ्या सर्व बागायतदारांना कळविण्यात येते की, चालू वर्षी प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठ्यानुसार रब्बी हंगाम दि. 1 सप्टेंबर, 2020 ते 28 फेब्रुवारी, 2021 या मुदतीत कपाशी, ज्वारी, गहु, हरभरा, बारमाही इतर बारमाही भाजीपाला इतर तेलबिया कडधान्य व भूसार पिके इत्यादी पिकांसाठी पिण्याचे पाण्याचे आरक्षण व्यतिरीक्त उपलब्ध साठयातून खालील अटीस अनुसरुन पाणी पुरवठा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
तरी खालील अटीच्या पुर्ततेसह नमूना नं. 7 चे पाणीअर्जावर मागणी करुन पाणी अर्ज दिनांक 10 नोव्हेबर, 2020 च्या आत संबंधीत वाघुर धरण उपविभाग क्र. 1 व 2 वराडसिम, वाघुर धरण उपविभाग क्र. 3 व 4 नशिराबाद या कार्यालयात कार्यालयीन वेळेत पोष्टाने अगर प्रत्यक्ष देण्याचे करावे.
सिंचनाच्या पाणीपुरवठ्यासाठी खालील अटी व शर्ती राहतील –
रब्बी हंगाम सन 2020-21 अखेर संपुर्ण थकबाकी भरणे आवश्यक राहील, पाटमोट संबंध नसावा, प्रत्येक चारीवर सलग क्षेत्रासच मंजुरी दिली जाईल, शेतचारी स्वच्छ व गवत काढलेली असावी. प्रत्यक्ष पास मिळाल्याशिवाय मंजूरी मिळाली असे समजू नये, पाणी अर्जाच्या निर्णय संबंधित उपविभाग, पाटशाखेत/ ग्रामपंचायत कार्यालय नोटीस बोर्डावर जाहीर करण्यात येईल, मुदतीनंतर आलेले पाणी अर्जावर नियमानुसार जादा पाणीपट्टी आकारणी केली जाईल, मंजुर क्षेत्रासच व मंजुर पिकानांच पाणी घ्यावे लागेल, पाणी अर्ज देतांना 7/12 उतारा किंवा खाते पुस्तीका संबंधित उपविभागास दाखवावी लागेल, पाटबंधारे अधिनियम (कायदा) 1976 च्या प्रचलीत धोरणानुसार तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमीत केलेल्या शासन आदेशानुसारच मंजुरी देण्यात येईल, उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने वापर करुन अन्नधान्याचे अधिक उत्पादन वाढवावे, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांचे आदेश क्र.1 /2018 दि. 11 जानेवारी, 2018 नुसार सुधारीत दराप्रमाणे केलेली आकारणी भरणे बंधनकारक राहील. असे कार्यकारी अभियंता, वाघुर धरण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.