पोर्टलवर पिक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्‍यांची माहिती भरण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । पिक विमा योजना रब्बी हंगाम 2020-21 अंतर्गत जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची माहिती बँकेमार्फत विहीत मुदतीत विमा पोर्टलवर भरलेली नाही. यामुळे भविष्यात पिक विमा मंजुर झाल्यास शेतकरी लाभार्थी पिक विम्याच्या नुकसान भरपाई पासुन वंचित राहू नये. यास्तव उपायुक्त, (पत), कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, कृषि भवन, नवी दिल्ली यांनी सर्व बँकाना ज्या शेतकऱ्यांची माहिती भरण्याची प्रक्रिया अपुर्ण राहीली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांची माहिती भरण्याची शेवटची संधी दिली आहे. त्यानुसार दि. 22 ते 26 मार्च, 2021 दरम्यान पोर्टल पुन:श्च सुरु करण्यात येणार आहे. 

जिल्हयातील सर्व बँकांना जिल्हा अग्रणी बँक, जळगाव यांचेमार्फत याबाबतच्या सुचना दिल्या आहे. तरी शेतकरी बांधवांनाही आवाहन करण्यात येते की, त्यांची माहिती अपुर्ण भरली गेल्याने पिक विमा हप्ता भरला गेला नसल्यास संबंधित बँकांशी  संपर्क साधुन विमा पोर्टलवर विहीत मुदतीत माहिती भरण्याची प्रक्रिया पुर्ण करण्याबाबत सुचित करावे. 

यासंबधी काही अडचणी आल्यास संबंधित तालुका कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि उपसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

Protected Content