मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी । सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्ष शुल्क योजनेचे अर्ज भरण्याकरिता महाडीबीटी हे ऑनलाईन पोर्टल दि. 3 डिसेंबर, 2020 पासून सुरु झाले आहे. तथापि गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अद्यापपर्यंत अनु.जाती प्रवर्गाचे 66% तर विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गाचे  69% अर्ज भरण्यात आलेले आहेत.

तरी सर्व  मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अर्ज तत्काळ भरण्यात यावेत तसेच महाविद्यालयाच्या लॉग-इन वर प्रलंबित असलेले अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव कार्यालयाच्या  लॉग-इन वर त्वरित पाठवावे.

महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी  स्वत: वैयक्तिक लक्ष घालून एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती / शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. 

Protected Content