
जळगाव (प्रतिनिधी) कापूस पिकासाठी एचटीबीटी या बंदी असलेल्या वाणास केंद्र शासनामार्फत मान्यता देण्यात आली नसल्याने शेतकरी बांधवांनी या वाणाची लागवड करु नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
कापूस पिकाच्या वाणांचे अवैधरित्या व बील घेतल्याशिवाय खरेदी करु नये, असे श्री. संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.