जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३२ व्या पदवीप्रदान समारंभात ज्या विद्यार्थ्यांना पदवी/पदवीका, तसेच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) धारक विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र घ्यावयाचे आहेत त्यांनी १९ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत.
विद्यापीठातर्फे डिसेंबर, २०२२ आणि एप्रिल/मे/जून-२०२३ तसेच त्यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि पीएच.डी. धारकांकरिता, पदवी/पदविका प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर Home Page वरील Student Corner-> Examination-> Convocation वर उपलब्ध आहे. विनाविलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. २० सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत आहे. उत्तीर्ण वर्षापासून पाचवर्षाच्या आत पदवीप्रमाणपत्र शुल्क रूपये ५००/- असून उत्तीर्ण वर्षापासून पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्यास रूपये १३००/- भरावे लागतील. तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २० ऑक्टोबर ते ०४ नोव्हेंबर, २०२३ पर्यंत आहे. पदवीप्रमाणपत्राचे शुल्क क्रेडिट कार्ड/डेबीट कार्ड/ नेट बँकिग द्वारे ऑनलाईन भरावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. योगेश नारायण पाटील यांनी केले आहे.