अपघातात जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Crime

जळगाव प्रतिनिधी । मित्रांसोबत वरणगाव येथे कामाच्या निमित्ताने तरूणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, सुरेश पुरा चव्हाण (वय-32) रा. उमरा ता.मुक्ताईनगर जि.जळगाव हा शेती काम करत असून शेतीच्या कामावरून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. 27 डिसेंबर 2019 रोज मित्र निलाभ (पुर्ण नाव माहित नाही) रा. खांबगाव जि. बुलढाणा हा सुरेशला घेण्यासाठी सकाळी 7 वाजता आला होता. सुरेश आपली दुचाकी घेवून निलाभ सोबत वरणगाव येथे जाण्यासाठी निघाला. वरणगावजवळील इदरस फाट्या जवळ अज्ञान चारचाकी वाहनाने जोरात धडक दिल्याने सुरेशच्या डोक्याला जबर दुखापत झाला. त्याला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्या आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आला असून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सुरेशच्या पश्चात आई सुमनबाई, वडील पुरा चव्हाण, पत्नी फुलाबाई, मुलगा रोशन, मुलगा रक्षा आणि तीन भाऊ असा परीवार आहे.

Protected Content