मँचेस्टर वृत्तसंस्था । भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज (दि.9 जुलै) रोजी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर वर्ल्ड कप स्पर्धेचा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे.
या सामन्यात नक्की कोणाला अंतिम अकरामध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. हा प्रश्न दोन्ही संघांसाठी डोकेदुखीचा ठरणारा आहे. पावसाचा लहरीपणा लक्षात घेता. परंतू कोणत्या कॉम्बिनेशनने मैदानावर उतरावे, याचे उत्तर शोधण्यात दोन्ही संघांचे कर्णधार व्यग्र आहेत. या सामन्यात भारतीय संघ भुवनेश्वर कुमार किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी कोणाची निवड करतील? टीम इंडिया दोन फिरकीपटूंसह मैदानावर उतरेल का? केदार जाधव हा सहावा गोलंदाजाचा पर्याय असेल का ? रवींद्र जडेजाचे संघातील स्थान कायम राहिल का? असे अनेक प्रश्न भारतीय चाहत्यांना भेडसावत आहेत.