फैजपूर प्रतिनिधी । संपूर्ण जळगाव जिल्ह्यात दि.15 ते 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या संचारबंदी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 25 नागरिकांची आज शुक्रवारी रात्री रॅपीड अँटीजेन टेस्ट करण्यात आली तर विनामास्क फिरणाऱ्या 10 जणांकडून 3 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या अँटीजन टेस्ट वाढवण्यात आल्या आहेत. तरी देखील नागरिक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात न घेता रात्री आठ नंतर विनाकारण घराबाहेर फिरत आहे. अशा नागरिकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांची पोलिस प्रशासन व नगरपालिका फैजपूर शहरात कोरोना टेस्ट करीत आहेत.
या पथकामध्ये एपीआय प्रकाश वानखडे, पीएसआय रोहिदास ठोंबरे, डॉ समीर सय्यद पालिकेचे कर निरीक्षक बाजीराव नवले, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश भोई, बाळू भोई, नामदेव काकडे, ज्ञानेश्वर पवार, देविदास सूरदास,अरुण नमाते, पालिका कर्मचारी शिवा नेहेते, हेमराज बढे, अनिकेत साळुंके व यास होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते