यावल प्रतिनिधी- प्रशासनाच्या वतीने आज यावलच्या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातुन शहरातील व परिसरातील व्यापाऱ्यांची रॅपीड अँटीजेन स्वॅब तपासणी करण्यात आली.
आल्यानंतर यातील २ जणांचा चाचणीअहवाल पॉझीटीव्ह तर आजपर्यंत करण्यात आलेल्या तपासणी मोहीमेत ७०० जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली असुन यातील १० जणांचा चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आल्याचे वैद्यकीय सुत्रांकडुन सांगण्यात आले.
मागील चार दिवसांपासुन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी .बी .बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाचे औषधनिर्माण अधिकारी सुर्यकांत पाटील , ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके, सुभाष राणे व आदी आरोग्य कर्मचारी या आरोग्य तपासणी मोहीमेत सहभागी असुन , आजपर्यंत यावल ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहीमेस शहरातुन व परिसरातील नागरीकांचा मोठा प्रतिसाद मिळत असुन आज पर्यंत एकुण ७००च्यावर व्यवसायीकांची तपासणी करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांकडुन मिळाली आहे .