रावेर प्रतिनिधी । येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाची (एएलएफ) वस्तीस्तर वार्षिक सभा दि. 27 ऑगस्ट रोजी संपन्न करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, कार्यक्रमाची सुरुवाती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा समन्वयक अधिकरी मा. आतिक शेख आणि नगरपरिषदेचे समुदाय संघटक निलेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी छाया महाजन होत्या. यावेळी जिल्हा कार्यालयातील युवराज पाटील, विजय स्वामी, दीपक वाणी यांनी बचत गटाच्या महिलांना विविध योजनेंबाबत मार्गदर्शन करत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी शहरातील 25 बचत गटातील 240 महिला उपस्थिती होत्या. प्रास्ताविका व्यवस्थापक मीना तडवी यांनी तर आभार लेखापाल अविनाश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्षेत्रीय समन्वयक हिना तडवी, आयशा तडवी, छाया महाजन आणि भारती चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले.