जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मूळजी जेठा महाविद्यालयाच्या जुन्या कॉन्फरन्स हॉलमध्ये संपन्न झाली.
वार्षिक सर्वसाधारण सभेस संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, उपाध्यक्ष ॲड. प्रकाश पाटील कोषाध्यक्ष डी. टी. पाटील, सचिव ॲड. सिताराम फालक, व्यवस्थापन सदस्य ॲड. प्रमोद पाटील, हरीश मिलवानी, प्रा. चारुदत्त गोखले, सुधीर बेंडाळे, डॉ. हर्षवर्धन जावळे, डॉ. मीनाक्षी वायकोळे, लक्ष्मीकांत चौबे, श्रीकांत मनियार, प्राध्यापक संजय भारंबे, मंगेश झोपे हे मंचावर उपस्थित होते.
सभेत संस्थेतील विविध शाखा मधील प्राध्यापक कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. यात डॉ. भूपेंद्र केसुर, रवींद्र पाटील, डॉ. जयश्री भिरूड, डॉ. मनोज पांडे ,डॉ. आर आर महिरे, डॉ.वसीम आर शेख, डॉ. गुलाब तडवी, डॉ. राजीव पवार, डॉ. कविता पाटील, डॉ. प्रतिभा निकम, डॉ. चंद्रमणी लभाणे, डॉ. बालाजी राऊत, डॉ. संगीता चंद्रात्रे, डॉ. नयना फिरके, प्रा. अभिजीत पाटील ,प्रा. दिपाली किरंगे, प्रा. तनुजा फेगडे, प्रा. धनपाल वाघुळदे, प्रा. स्वप्निल काटे, प्रा. रवींद्र पाटील पीजी महाविद्यालय , प्रा. स्नेहल देशमुख, डॉ. संजय कुमावत, सुषमा कंची, डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर, रणजीत पाटील, देवेंद्र चौधरी, प्रा. संजय सुगंधी, संजय दहाड ,डॉ. शिल्पा बेंडाळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सुषमा कंची, प्रा. संजय पावडे, डी. टी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे यांनी पुढील पाच वर्षातील व्हिजन सर्वांसमोर मांडले. यात केसीई सोसायटीच्या विविध मान्यता प्राप्त शाखा यांच्यात समन्वय घडवून विद्यार्थी हितासाठी व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी अभिनव उपक्रम राबवून तसेच नॉलेज बेस, स्किल बेस्ट एज्युकेशन पॉलिसी आपण राबवणार असल्याचे भाकीत केले आणि लवकरच क्लस्टर विद्यापीठ आपण होवू असे सुतवाच केले. यासोबतच आगामी काळात सप्तकलादालन, समुदाय रेडिओ आणि अद्यावत असा ऑडिओ व्हिडिओ स्टुडिओ, भव्य असा ऑडिटोरियम आपण साकारणार असल्याची देखील त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ॲड. प्रमोद पाटील यांनी मानले.